सेंटर मध्ये अनुभवी क्लिनिकल सायकोलोजीस्ट नेमलेले आहेत . रुग्णांचे समुपदेशन नियमितरीत्या केले जाते आणि गरज भासल्यास रुग्णांच्या कुटुंबियांचेही समुपदेशन केले जाते..

वेगवेगळ्या विषयांवर सामूहिक चर्चा , रोल प्ले , बुद्धीला चालना देणारे खेळ इत्यादी सामुहिक कृती रुग्णांच्या कडून करवून घेतल्या जातात .

तसेच सामुहिक खेळ जसे अंताक्षरी, संगीत खुर्ची वगैरे, सार्वजनिक स्वच्छता यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.

रुग्णांचा आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक उन्नतीवर भर दिला जातो.